गिरीश महाजन पागल झालेत, त्यांना जळीस्थळी पाषाणी केवळ नाथाभाऊ दिसतात; एकनाथ खडसेंची टीका

महाराष्ट्रात मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील वैर सर्वश्रुत आहेत. ते दोघे एकमेंकावर टीका करत असतात. ते दोघे भाजपमध्ये असतानाही त्यांच्यात राजकीय चढाओढ होती. त्यानंतर एकनाथ खडसे शरद पवार यांच्या पक्षात गेल्याने त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय वैर वाढतच गेले. आता रविवारी एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

एकनाथ खडसे म्हणाले, गिरीश महाजन पागल झाले आहेत. गिरीश महाजन यांना जळीस्थळी पाषाणी घरीदारी केवळ नाथाभाऊ दिसतात. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर मी आता बोलणं टाळतो आहे. नाथाभाऊ वर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात, असेही खडसे म्हणाले. एकनाथ खडसे यांची सून आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांनी दोघांमधील राजकीय वैर कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे या दोघांमधील वाद त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.

महाजन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपल्याबाबत बोलतात. नाथाभाऊवर बोललं म्हणजे प्रसिद्धी मिळते म्हणून गिरीश महाजन माझ्यावर बोलतात. त्यांना जळीस्थळी पाषाणी नाथाभाऊ दिसतात. ते पागल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलणे टाळत असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.

संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना सरकारच्या माध्यमातून किंवा समाजाच्या माध्यमातून संरक्षण असता कामा नये. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. दीड महिना होऊनही खरे मारेकरी कोण हे अद्याप समोर आलेलं नाही हे सरकारचे अपयश आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्यांना तातडीने अटक व्हावी, अशी मागणीही खडसे यांनी केली.