महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये परतण्याची शक्यता धूसर दिसत आहे. कारण त्यांनी पक्षात पुन्हा प्रवेश करण्यास कधीही उत्सुक नसल्याचं सांगितलं आहे. तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा पक्षातील पुन्हा प्रवेश रोखू शकतात असा दावाही त्यांनी केला आहे. पीटीआयने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
STORY | Wasn’t keen on return to BJP: Eknath Khadse; points fingers at Fadnavis
READ: https://t.co/ZFV843yJCZ pic.twitter.com/gP2jNUfrei
— Press Trust of India (@PTI_News) September 11, 2024
भाजपचे माजी नेते, सध्या शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेले एकनाथ खडसे हे भाजपात परतणार असल्याची चर्चा होती. त्यांची सून रक्षा खडसे यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर आणि जिंकल्यावर केंद्रीय मंत्री बनविल्यानंतर एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता.
पण एकनाथ खडसे यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच तयारी दर्शवली असतानाही भाजपकडून त्यांच्या पुनर्प्रवेशाबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. यामुळे आता खडसेंचा भाजप प्रवेश लांबणीवर पडण्याची किंवा जवळपास होणार नाहीच असं मानलं जात आहे.