प्रचार सभेसाठी मिंधेंच्या उमेदवाराने चोरली वीज

नांदेड उत्तरचे मिंधे गटाचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या  प्रचार सभेसाठी वीजचोरी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. कल्याणकर यांच्या सभेसाठी विद्युत खांबावरून आकडे टाकून वीज घेण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. वीजचोरीच्या घटनेवर नांदेड उत्तरच्या शिवसैनिकांनी मिंधे गटावर जोरदार हल्लाबोल केला.  ‘हे तर चोरच आहेत हे त्यांनी देवाच्या दारात सिद्ध करून दाखवले. या चोरांनी आधी पक्ष चोरला, चिन्ह चोरलं.  पक्ष, चिन्ह चोरल्यानंतर आता यांनी लाईटसुद्धा चोरलेली आहे. महादेवाच्या मंदिरात कधी चोरी लपत नाही, अशी प्रतिक्रिया नांदेड उत्तरच्या शिवसैनिकांनी दिली.