
हिंदुस्थानातील बॅडमिंटनच्या ज्युनियर गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी पीएनबी मेटलाइफ या प्रीमिअर लाइफ इन्श्युरन्स कंपनीने पुढाकार घेतला असून ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे आठवे पर्व दहा शहरांमध्ये खेळविले जाणार आहे. लहान वयोगटातील बॅडमिंटन खेळाडूंच्या पॅशनला आणि तळमळीला प्रोत्साहन देण्यासाठी पीएनबीने या पर्वाची घोषणा केली.
या वर्षीची चॅम्पियनशिप दिल्ली, मुंबई, बंगळुरू, गुवाहाटी, कोची, जालंधर, अहमदाबाद, हैदराबाद, रांची आणि लखनौ या दहा प्रमुख शहरांमध्ये खेळविली जाणार आहे. या शहरांमधील 7 ते 17 वयोगटातील लहान वयोगटातील खेळाडूंना राज्य पातळीवर आपले कौशल्य सादर करण्याची आणि स्पर्धा करण्याची संधी या चॅम्पियनशिपच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. ही स्पर्धा नवी दिल्ली येथे 1 ऑगस्टपासून सुरू होईल तर मुंबईत ही स्पर्धा 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे. पीएनबी मेटलाइफ ज्युनियर चॅम्पियनशिप हे गुणवंत खेळाडूंना चालना देण्याचे आणि देशातील तरुणांमध्ये खिलाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे एक व्यासपीठ म्हणून उदयास आले असल्याचे पीएनबी मेटलाइफचे एमडी समीर बन्सल यांनी सांगितले.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 9820006190 या क्रमांकावर संपर्क साधावा.