कर्नाटकमध्ये आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराने मृत्यू, शिक्षिकेला वही दाखवत असताना अचानक खाली कोसळली

कर्नाटकची राजधानी बंगळुरूपासून 175 किलोमीटर अंतरावर असलेल्या चामराज नगर तालुक्यात आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. येथील बदानुप्पे गावात श्रुती-लिंगराज यांची मुलगी तेजस्विनी दगावल्याने त्यांच्या कुटुंबावर एकच शोककळा पसरली. शाळेत शिक्षिकेला वही दाखवत असताना ती अचानक खाली कोसळली आणि मृत पावली. खाली कोसळताच तातडीने जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

तेजस्विनी शाळेत आली तेव्हा सुस्थितीत असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले, पण वही तपासायला ती उभी राहिली तेव्हा तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर येऊन खाली पडली.