Jalna News – महायुती सरकारच्या जाहीरनाम्याची आठ गावांत होळी

महायुतीने निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनाकडे स्पशेल दुर्लक्ष करण्यात आल्याने सरकारच्या जाहीरनाम्याची घनसावंगी तालुक्यातील आठ गावांत होळी करण्यात आली आहे. महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यातील शेतकरी, लाडक्या बहिणी, जनतेला महायुतीतील तिन्ही पक्षांनी संकल्पनामामध्ये दिलेल्या आश्वासनांची फसवणूक केल्याबद्दल 14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता घनसावंगी तालुक्यातील बोरगाव खुर्द, बानेगाव, भोगगाव, भुतेगाव मासेगाव, सिंदखेड, भांदली, मंगरूळ या आठ गावातील प्रमुख चौकात महायुतीच्या संकल्पनाम्याची होळी करण्यात आली. शेतकऱ्यांना पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कर्जमाफी, सोयाबीनची 6 हजार रुपयांनी  खरेदी, सर्व शेती निविष्ठावरील जीएसटी कर रद्द करणार, एमएसपी अंतर्गत येणाऱ्या सर्व शेतीमालाला 20 टक्के बोनस देऊन खरेदी करणार, लाडक्या बहिणीना 2100 रुपये महिना देणार, सुशिक्षित बेरोजगारांना 10 हजार रुपये महिना देणार, ज्येष्ठ नागरिक, विधवांना महिना 2100 रुपये देणार अशी अनेक आश्वासने निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली होती.