लेबननमध्ये पेजरचे स्फोट, आठ जणांचा मृत्यू; इराणच्या राजदुतासह 2750 जण जखमी

इराणमध्ये हिजबुल्लाह संघटनेच्या अनेक सदस्यांचे पेजरमध्ये स्फोट झाले. या पेजर स्फोटात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. इतकंच नाही तर या स्फोटांमध्ये अडीच हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यात इराणच्या एका राजदुताचाही समावेश आहे. हिजबुल्लाहा ही इराण समर्थित लेबननमधली दशहतवादी संघटना आहे. हिजबुल्लाहा संघटनेने या स्फोटांसाठी इस्रायलला जबाबदार ठरवलं आहे.

 

बैरुतच्या दहियाह भागात हे स्फोट झाले आहेत. लेबननच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार अल नहरी आणि रियाक भागातही पेजर हॅक करून त्यांचे स्फोट घडवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. लेबननच्या अधिकाऱ्यानेही इस्रायलने हा हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त केला आहे.

ज्यांच्याकडे पेजर आहेत त्यांनी ते फेकून द्यावेत असे आवाहन लेबननच्या आरोग्य मंत्रायलाने केले आहे. तसेच दुसरीकडे आरोग्य मंत्रालयाने सर्व रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवले आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबरध्ये गाझामध्ये इस्रायलने हल्ले केले होते. तेव्हापासून इराण समर्थित हिजबुल्लाह संघटनेची आणि इस्रायलची गाझा सीमेवर संघर्ष सुरू झाला होता. त्यानंतर वर्षभरात परिस्थिती आणखीन चिघळली आहे. दोन्ही बाजूने हल्ले सुरूच आहे. अमेरिकेसह युरोपीयन देशांनी हिज्बुल्लाह संघटनेवर बंदी घातली आहे.

पेजर वापरण्याची वेळ
मोबाईल आल्यानंतर पेजर बाजारातून गायब झाले होते. पण गुप्त संदेश पाठवण्यासाठी पेजरचा आजही वापर होतो. हिजबुल्लाह संघटनेच्या लोकांनी यासाठीच पेजर वापरायला सुरुवात केली होती. पण ते पेजरही हॅक करून त्यात स्फोट घडवले गेले.