हेच ते गुजरात मॉडेल! अमेरिकेतून परत पाठवलेल्या गुजरातींची चेहरे झाकले

अमेरिकेत बेकायदेशीरित्या घुसलेल्या अनेक भारतीयांना अमेरिकेने परत पाठवले आहे. यात अनेक भारतीय हे गुजरातचे असून त्यांना अहमदाबाद विमातळावर आणले तेव्हा त्यांनी तोंड झाकले होते. अमेरिकेने ज्या भारतीयांना परत पाठवले त्यापैकी 8 जण अहमदाबाद विमानतळावर आले होते. सर्वांनी आपले तोंड झाकले होते. आठही नागरिक हे गांधीनगर आणि मेहसाणा जिल्ह्याचे रहिवासी होते. सर्वांना पोलिसांनी आपल्या गाडीत घातलं आणि त्यांच्या घरी सोडलं. यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता. सर्व नागरिकांनी तोंडाला मास्क घातलं होता तसेच आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करत होते. गेल्या आठवडाभरात 41 गुजराती लोकांना अमेरिकेतून परत पाठवण्यात आले आहे. सर्व नागरिकांना पोलिसांच्या कडकोट बंदोबस्तात त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहे.

यापूर्वीही काही गुजराती नागरिकांना अमेरिकेत पाठवण्यात आले होते, त्यांचेही तोंड अशाच प्रकारे झाकण्यात आले होते. आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले होते. पहिल्या फ्लाईटमधून जेवढे भारतीय परत पाठवण्यात आले होते त्यात सर्वाधिक गुजरात आणि हरयाणाचे रहिवासी होते.