
समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या महामानव प्रतिष्ठान व ‘एक वही एक पेन’ अभियानने यंदाची ‘भीमजयंती’ शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महाराष्ट्रासह देशविदेशात साजरी केली जाते. त्यानिमित्त पुढील महिनाभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.
या कार्यक्रमांवर होणाऱ्या खर्चात बचत करून बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर वह्या, पुस्तके, दप्तरे, कपडे, वापरात नसलेले सुस्थितीतील मोबाईल फोन, लॅपटॉप आदी वाहून अभिवादन करावे आणि नंतर ते साहित्य समाजातील आर्थिक दुर्बल, आदिवासी व गरजूंना वितरीत करावे किंवा वितरणासाठी 9372343108 या क्रमांकावर संपर्क साधून सुपूर्द करावे. जेणेकरून बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत होऊ शकेल, असे आवाहन ‘एक वही एक पेन’ अभियानाचे राजू झनके यांनी केले आहे.