आता विद्यापिठांच्या कॅण्टिनमधील ‘या’ पदार्थांच्या विक्रीवर बंदी, यूजीसीने जारी केली मार्गदर्शक तत्वे

कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. आता विद्यापिठांमधील कॅण्टिनमध्ये मिळणारे समोसे, नूडल्स सारखे पदार्थांच्या विक्रीवर बंदी येणार असून कॅण्टीनमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार मिळणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठे आणि पदवी महाविद्यालयांच्या कॅण्टिनमध्ये पुरवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत.

यूजीसीकडून देशातील विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांना सोमवारी 15 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आता महाविद्यालयाच्या कँटीनमधून केवळ सकस अन्न पदार्थ दिला जावा असे सांगितले आहे. अधिकृत अपडेटनुसार, नॅशनल ॲडव्होकसी इन पब्लिक इंटरेस्ट (NAPI) हा पोषण विषयावरील राष्ट्रीय थिंक टँक आहे, ज्यामध्ये महामारीविज्ञान, मानवी पोषण, सामुदायिक पोषण आणि बालरोग, वैद्यकीय शिक्षण, प्रशासन, सामाजिक कार्य आणि व्यवस्थापन यांचा समावेश आहे. वाढता लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर गैर-संसर्गजन्य रोग (NCDs) बद्दल चिंतित, NAP ने सामान्य NCDs (2017-2022) च्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राष्ट्रीय बहु-क्षेत्रीय कृती योजना (NMAP) च्या त्वरीत अंमलबजावणीचे आवाहन केले आहे,.”

त्यानंतर यूजीसी कडून सांगण्यात आले आहे की, याबाबच उच्च शैक्षणिक संस्थांना 10 नोव्हेबर 2016 आणि 21 ऑगस्ट 2018 रोजी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. त्यामुळे आता या संस्थांना पुन्हा एकदा इशारा दिला जात आहे की, आपल्या कॅण्टिनमध्ये आरोग्यासाठी घातक पदार्थांवर बंदी घालावी आणि सकस अन्नपदार्थ देण्याला प्राधान्य द्यावे. असे केल्याने आपण अनेक आजारांना दूर करण्यास मदत करु.