काय म्हणली रे आर्ची?… 20 तारखेला मतदान कर म्हणली… तरुण मतदारांना मीम्समधून साद 

विधानसभेसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर केला जात आहे. ‘सैराट’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगचा वापर करत. काय म्हणली रे आर्ची?… 20 तारखेला मतदान कर म्हणली… असा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच एक वोट की किमत तुम क्या जानो रमेश बाबू… या डायलॉगचा फोटोही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. कब है होलीच्या धर्तीवर कब है, वोटिंग कब है… माझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे… तुझ्याकडे काय आहे… माझ्याकडे मतदानाचा अधिकार आहे… 20 नोव्हेंबर को वोट करने मेरे करन-अर्जुन जरूर आयेंगे. सुट्टी असूनही मतदान न करणे गुन्हा आहे. डोन्ट अंडरइस्टिमेंट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन अशा वेगवेगळ्या गमतीदार मीम्समधून मतदारांना साद घातली जात आहे. मतदान जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर केला जात आहे.