
ईडीने सहारा ग्रुपवर मोठी कारवाई करत लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली सिटीतील 707 एकर जमीन जप्त केली आहे. या जमिनीची अंदाजे बाजारभवानुसार किंमत सुमारे 1 हजार 460 कोटी रुपये आहे. ही जप्ती मनी लॉण्डरिंग प्रतिबंधक कायदा 2002 अंतर्गत करण्यात आली आहे. ही जमीन बेनामी नावांनी खरेदी केल्याचे तपासात उघड झाले आहे. सहारा गुपच्या विविध कंपन्यांकडून घेतलेल्या पैशांनी ही हजारो कोटींची जमीन खरेदी करण्यात आली होती. याची खरी मालकी लपवण्यासाठी बनावट नावांची नोंदणी करण्यात आल्याची माहिती ईडीच्या एका अधिकाऱ्याने दिली.