मुंब्रामध्ये ईडीचा छापा

 

मुंब्रातील सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) च्या ऑफिसवर आज सकाळी ईडीने छापेमारी केली. दहशतवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात एसडी पी आयचे देखील संबंध असल्याच्या संशयातून ईडीने दोन दिवसांपूर्वी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष एन. के. फैजी यांना दिल्लीतून अटक केली. त्यानंतर ईडीने एसडीपीआयच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यालयांवर छापा मारला. या कारवाईदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी एसडीपीआयच्या मुंब्रा कार्यालयातील दोघांची चौकशी केली.

एसडीपीआयच्या मुंब्रा येथील कार्यालयावर केलेल्या छापेमारीदरम्यान ईडीच्या पथकाने जनरल सेक्रेटरी शाहरुख आणि व्हाईस प्रेसिडेंट सरफराज या दोघांची सहा तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान ईडीच्या पथकाने पक्षाची कागदपत्रे, बँकेचे व्यवहार, नोंद वही, लॅपटॉप असा काही मुद्देमाल तपासासाठी ताब्यात घेतला आहे.