बांगलादेशी घुसखोरीप्रकरणी मालेगावात ईडीचे छापे

बोगस जन्मदाखल्याद्वारे बांगलादेशींनी वास्तव्य केल्याप्रकरणी शुक्रवारी मालेगावात ईडीने नऊ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यामुळे येथे खळबळ उडाली आहे.

बनावट कागदपत्रांद्वारे बनावट जन्मदाखले तयार करून बांगलादेशी मालेगावात वास्तव्य करीत असल्याचे काही दिवसांपूर्वी चव्हाटय़ावर आले. यात मालेगाव महापालिकेच्या सेवेत असलेला तव्वाब शेख याचा सहभाग आढळला. त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण सोळा गुन्हे दाखल केले आहेत. या तपासाच्या आधारे ईडीने शुक्रवारी नऊ ठिकाणी छापे टाकले.