50 कोटींचा कुत्रा खरेदी करताच ईडीची धाड

बंगळुरूमधील सतीश नावाच्या एका व्यक्तीने 50 कोटी रुपये किमतीचा कुत्रा खरेदी केल्याची माहिती समजताच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) श्वान मालकाच्या घरी गुरुवारी धाड टाकली. कुत्रा खरेदी करण्यासाठी 50 कोटी रुपये कसे पे केले, अशी विचारणा ईडीने केली. अकाउंटमध्ये कोणतेही ट्रान्झॅक्शन झालेले नाही तसेच खरेदीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे 50 कोटींत हा श्वान खरेदी केल्याची माहिती चुकीची असल्याचे दिसत आहे. ईडीकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.