नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीची कारवाई, AJL ला पाठवली जप्तीची नोटीस

नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कारवाई करत असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची (AJL) 661 कोटींची मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याप्रकरणी 11 एप्रिल 2025 रोजी ईडीने दिल्ली, मुंबई आणि लखनौमधील मालमत्ता रजिस्ट्रारना नोटीस बजावली आहेत याशिवाय मुंबईतील हेराल्ड हाऊसमधील जिंदाल साउथ वेस्ट प्रोजेक्ट्स लिमिटेडलाही नोटीस पाठवण्यात आली आहे.

याबाबत माहिती देताना एका निवेदनात ईडीने सांगितलं आहे की, त्यांनी शुक्रवारी दिल्लीच्या आयटीओमधील हेराल्ड हाऊस, मुंबईच्या वांद्रे आणि लखनौच्या बिशेश्वर नाथ रोडवरील एजेएल भवन येथे नोटीस पाठवल्या आहेत. या नोटीसमध्ये मुंबईतील मालमत्तेच्या बाबतीत जागा रिकामी करावी किंवा भाडे ईडीकडे हस्तांतरित करावं, असं सांगण्यात आलं. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMLA) कलम (8) आणि नियम 5(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती ईडीने दिली आहे.