अरविंद केजरीवाल यांची होणार ईडी चौकशी

आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची ईडी चौकशी होणार आहे. त्यांच्याविरोधात मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाला मंजुरी दिली आहे. तर दिल्लीचे नायब राज्यपाल विनय सक्सेना यांनीही केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. सरकारी कर्मचाऱयांवर खटला चालवावा लागेल. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणूनबुजून त्यांना प्रचारापासून दूर ठेवण्यासाठी मोदी सरकारने ही खेळी खेळल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. ईडीने गेल्या वर्षी मार्चमध्ये पीएमएलए कोर्टात केजरीवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यात केजरीवाल यांना दारू धोरण घोटाळय़ात आरोपी करण्यात आले होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आले होते.