घाटकोपरमधील अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा कागदाच्या लगद्यापासून पर्यावरणपूरक अशी बाप्पांची मूर्ती साकारली आहे. यंदा नशाबंदी, गुटखाबंदी आणि ऑनलाईन लॉटरी बंदी असे सामाजिक विषय हाताळत मंडळाने भव्य असा देखावा उभारला आहे.
मंडळाचे यंदाचे 56वे वर्षे असून अनेक सामाजिक विषय एकाच मांडवाखाली आणण्याचे कसब यंदा मंडळाने दाखवले आहे. दारू ढोसून भरधाव गाडय़ा चालवल्यामुळे अपघात होत आहेत. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालवणाऱया बडय़ा बापाच्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न खुद्द सरकारकडूनच होत आहे. दारूमुळे घरेच्या घरे उद्ध्वस्त होत आहेत. ऑनलाईन लॉटरीमुळे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक फसवणूक होत आहे. हे सर्व सामाजिक विषय घेऊन भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाने उत्तम देखावा साकारला आहे. या देखाव्याला भाविकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.