लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागला होता. पण आता तब्बल सहा महिन्यानंतर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची मतदानाची आकडेवारी जाहीर केली आहे. ही आकडेवारी जाहीर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी का लागला, असा सवाल विचारला जात असून शंकाही उपस्थित केली जात आहे.
“Proactive Disclosure of Extensive Data sets of the world’s Largest Elections”
ECI Releases Granular Data of Lok Sabha Elections 2024 and 4 Simultaneous Assembly Elections .
Read in detail : https://t.co/8wE75q2GzW #ECI #GeneralElections2024 pic.twitter.com/XficqNrfkG
— Election Commission of India (@ECISVEEP) December 26, 2024
निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार 97 कोटी 97 लाथ 51 हजार 847 नोंदणीकृत मतदार होते. 2019 साली 91 कोटी, 19 लाख 50 हजार 734 मतदार होते. 2019 च्या तुलनेत 2024 साली मतदारांच्या संख्येक 7.43 टक्क्यांनी वाढ झाली होती. 2024 साली 64 कोटी 64 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर 2019 साली 61 कोटी चार लाख मतदारांनी मतदान केले होते.
2024 लोकसभा निवडणुकीची आकडेवारी
ईव्हीए आणि पोस्टल व्होट – 64 कोटी 64 लाख 20 हजार 869
ईव्हीए व्होट – 64 कोटी 21 लाख 39 हजार 275
पुरुष: 32 कोटी 93 लाख 61 हजार 948
महिला: 31कोटी 27 लाख 64 हजार 269
तृतीयपंथी – 13 हजार 058
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आसामच्या धुबरी मतदान केंद्रावर सर्वाधिक म्हणजेच 92.3 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी जम्मू कश्मीरच्या श्रीनगरमध्ये 28.7 टक्के मतदान झाले आहे.
2024 मध्ये 65.78 टक्के महिलांनी मतदान केले होते (सूरत सोडून) तर पुरुषांनी 65.55 टक्के मतदान केले होते. 2019 आणि 2024 साली पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त प्रमाणात मतदान केले होते. 2024 साली 800 महिला उमदेवार निवडणुकीत उभ्या होत्या. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 111 महिलांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 80 तर तमिळनाडूमध्ये 77 महिलांनी निवडणूक लढवली होती. 543 पैकी 152 लोकसभा मतदारसंघात एकही महिला उमेदवार नव्हती.
राजकीय पक्षांची कामगिरी
2024 च्या लोकसभा निवडणुकीत 6 राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक लढवल होती, त्यांना एकूण 63.35 टक्के मतं मिळाली होदती. 2024 साली 7 हजार 190 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. सूरत लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. लोकसभा निवडणुकीत 3 हजार 921 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी 7 जिंकले, तर 3 हजार 905 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.