Delhi Election 2025 – निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, दिल्ली विधानसभा निवडणूक जाहीर होणार

आज दिल्लीत दुपारी दोन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. निवडणूक आयोग दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 15 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वी नवीन सरकार स्थापन होणे अपेक्षित आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आप, भाजप आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक ही तिरंगी होणार आहे.