सोप्पंय! घिबली फोटो असा बनवा, फ्रीमध्ये फोटो बनवण्याची सोपी ट्रिक

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सगळीकडे घिबली फोटो दिसत आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवरच्या स्टेट्सपासून ते फेसबुकपर्यंतच्या स्टोरीपर्यंत घिबलीने एकच धुमाकूळ घातला आहे. युजर्स वेगवेगळे फोटो घिबली स्टाईलमध्ये बदलून ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करत आहेत, परंतु अजूनही अनेक जणांना घिबली फोटो कसे बनवायचे हे माहिती नाही. त्यामुळे तुम्हाला हा ट्रेंड जाणून घेणे आवश्यक वाटत असेल तर घिबली फोटो बनवणे खूप सोपे आहे. तसेच हे मोफतसुद्धा आहे. घिबली फोटो तयार करण्यासाठी एआय टूल्सचा वापर केला जातोय.

घिबली फोटो बनवायचे असतील ते या ठिकाणी सोप्या ट्रिक्समध्ये जाणून घ्या… सर्वात आधी मोबाईल किंवा लॅपटॉपवर चॅटजीपीटी किंवा ग्रोक सर्च करून त्याला ओपन करा. या दोन्हीपैकी एक ओपन झाल्यानंतर तुमचा कोणताही एक फोटो निवडा. फोटो अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी टाईप करा. दिज इमेज कन्व्हर्ट इन टू घिबली. म्हणजेच हा फोटो घिबली फोटोमध्ये बनवून द्या.

ग्रोक किंवा चॅटजीपीटीला कमांड मिळताच त्या ठिकाणी अवघ्या 10 सेकंदांत फोटोवर काम करणे सुरू होईल. तुमच्या फोटोला किती वेळ लागेल याची माहितीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल. घिबली स्टाईलमध्ये पह्टो तयार झाल्यानंतर तो डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर सोशल मीडियावर शेअर करता येईल. ग्रोकसह काही टूल्स फ्री आहेत, परंतु काही वेळा एक फोटो बनवल्यानंतर दुसरा फोटो बराच वेळ जातो.

एका दिवसात फक्त 3 इमेज

चॅटजीपीटी युजर्स आता दिवसभरात एका मोबाईलवर केवळ तीन घिबली इमेज तयार करू शकणार आहेत. हे सध्या तरी तात्पुरत्या स्वरूपाचे आहे, असे ओपनएआयने म्हटले आहे. जास्तीच्या इमेज जनरेटरमुळे सर्व्हरवर खूप दबाव येतो.