
आधार हे आपल्या देशात एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बऱ्याचदा आधारकार्ड खराब होईल किंवा हरवेल या भीतीने आपण जवळ ठेवत नाही. अशावेळी व्हर्च्युअल आधारकार्ड जवळ ठेवता येईल. त्याची पीडीएफ फाईल डाऊनलोड करता येते. यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. व्हर्च्युअल आधारसाठी सर्वप्रथम यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जा. यानंतर माय आधार विभागात जाऊन डाऊनलोडवर क्लिक करा. आधार डाऊनलोडच्या पर्यायावर क्लिक करा. आधार क्रमांक, पॅप्चा टाका. रिक्वेस्ट ओटीपी बटणवर क्लिक करा.