
म्यानमार आणि थायलंड हे देश शुक्रवारी शक्तिशाली भूकंपाने हादरले. म्यानमारमधील भूकंपातील मृतांचा आकडा वाढला असून आतापर्यंत यात 700 च्या वर नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर 1600 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
म्यानमार आणि शेजारील थायलंड आज शक्तिशाली भूकंपाने हादरले. अनेक इमारती पत्त्यांसारख्या कोसळल्या, पूल आणि धरणांचे प्रचंड नुकसान झाले. या भूकंपाची क्षमता 7.7 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. या भूकंपामुळे इमारती कोसळतानाचे, नागरिक सैरावैरा इकडे तिकडे धावत असल्याचे, किंकाळ्या, आक्रोश आणि रस्तोरस्ती नागरिकांची गर्दी जमल्याचे भयंकर आणि ह्दयद्रावक परिस्थिती दर्शवणारे फोटो, व्हिडीयो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.