जम्मू-कश्मीरमध्ये आज भूपंपाचे धक्के बसले. येथे 4.8 रिश्टर स्केलचा भूपंप झाला. मात्र, जिवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी भूपंपाची नोंद झाली. भूपंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानात 36.49 अंश उत्तर अक्षांश आणि 71.27 अंश पूर्व रेखांशावर 165 किलोमीटर खोलीवर असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याआधी 13 नोव्हेंबरला जम्मू-कश्मीरमध्ये 5.2 तीव्रतेचे भूपंपाचे धक्के जाणवले होते.