
दिल्ली-एनसीआरमध्ये काही दिवसांपूर्वी भूकंपाचे हादरे बसले होते. पहाटे पहाटे दिल्लीकरांना 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाचा हादरा बसला होता. आता हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्या भूकंपाने हादरला आहे. मंडी जिल्ह्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे हादरे नागरिकांना जाणवले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र हे मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर भागातील किआर्गी गावाच्या परिसरात आहेत. सकाळी 8 वाजून 42 मिनिटांच्या दरम्यान भूकंपाचा धक्का बसला असून त्याची तिव्रता 3.7 रिश्टर स्केल इतकी होती. सात किलोमीटर क्षेत्रामध्ये भूकंपाचे धक्के नागरिकांना जाणवले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भात इंडिया टीव्हीने वृत्त दिले आहे.