म्यानमार आणि तिबेटनंतर नेपाळमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

म्यानमार आणि तिबेटनंतर आता नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, नेपाळमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. मात्र यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळमध्ये पहाटे 4:30 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच जपानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी होती. दरम्यान, याआधी 28 मार्च रोजी थायलंड आणि म्यानमारमध्ये आलेल्या 7.7 रिश्टर स्केल भूकंपामुळे मोठे नुकसान झाले होते. यामध्ये 3 हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते आणि हजारो लोक बेपत्ता झाले होते. हिंदुस्थानने म्यानमार आणि थायलंडला सर्वतोपरी मदत केली. तसेच काही दिवसांपूर्वी तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते.