मंगळवारी पहाटे नेपाळ-तिबेट सीमेवर 7.1 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे हिंदुस्थान, चीन, बांगलादेश आणि भूतानमध्येही जाणवले. तर हिंदुस्थानात अनेक राज्यांमध्ये भुकंपाचे हादरे बसले आहेत. उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगालपासून दिल्लीपर्यंत लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.
या भूकंपाचे केंद्र नेपाळ आणि तिबेटच्या सीमेजवळ असल्याची माहिती समोर आली आहे. हिंदुस्थानमध्ये बिहारमधील मोतिहारी आणि समस्तीपूरसह अनेक भागात सकाळी 6.40 वाजचा अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. पाच सेकंदांपर्यंत हे झटके जाणवले. नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता 7.1 एवढी मोजण्यात आली. या भूकंपामुळे कोणतीही जिवीतहानी आणि वित्तहानी झालेली नाही.