
बुधवारी सकाळी 7.15 वाजता मराठवाडा भूपंपाने हादरला. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ांत लागोपाठ दोन जोरदार धक्के बसल्याने लोक घाबरून रस्त्यावर आले. रिश्टर स्केलवर या भूपंपाची नोंद 4.5 एवढी झाली आहे. या भूपंपात सुदैवाने जीवित हानी झाली नाही, मात्र अनेक ठिकाणी घरांना तडे गेले. या भूपंपाचा धक्का थेट विदर्भातील वाशीम, बुलढाण्यापर्यंत जाणवला.
सकाळी अचानक जमिनीतून मोठा गडगडाट झाला. त्यापाठोपाठ जमीन काही क्षणांसाठी हादरली. नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ांत या धक्क्याची तीव्रता दूरदूरपर्यंत जाणवली. कळमनुरीतील रामेश्वर तांडा येथे भूपंपाचा पेंद्रबिंदू होता.