ऍथलेटिक्सची शोपीस शर्यत

>> द्वारकानाथ संझगिरी

अॅथलेटिक्समधली 100 मीटरची शर्यत हा ऑलिम्पिकचा शोपीस असतो.

पुरुषांच्या शर्यतीत ती शर्यत दहा सेपंदसुद्धा होत नाही. पण तरीही ते हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढे सेपंद पाहण्यासाठी सर्वांचे डोळे आसुसलेले असतात. कारण ही शर्यत जगातला सर्वात वेगवान मानव ठरवते. अर्थात जगातला वेगवान  मानव हा त्या ऑलिम्पिकपुरता असतो. तो सार्वकालीन नसतो.

यावेळी अमेरिकेचा नोव्हा लॉयल हा सर्वात वेगवान माणूस  ठरला. खरं तर या  शर्यतीच्या वेळेला जगाचे डोळे आणखीन एका धावपटूवर रोखले गेले होते. तो होता जमैकाचा थॉमसन.

तो .005 सेपंदाने हरला.  नुसत्या डोळय़ाने ते दिसणे शक्यच नव्हतं. आधुनिक तंत्राने एका सेपंदाचे लचके तोडून कोण जिंकला ते ठरवलं. अमेरिकेच्या नोहालासुद्धा वाटलं होतं की, थॉमसन जिंकलाय. त्याने तसं थॉमसनलासुद्धा सांगितलं. पण त्याने बोर्डावर स्वतःचं नाव बघितलं आणि तो थक्क झाला. थॉमसनचा पाय त्या अंतिम रेषेपुढे होता; पण नियम असा आहे की, धडाचा काही भाग तरी अंतिम रेषेच्या पुढे असावा लागतो. ज्याचा पहिला जातो तो विजयी ठरतो आणि नोहाचा तो होता म्हणून नोहा जिंकला. डोपं, हात, पाय, इतर काहीही पुढे असेना, याचा जिंकण्याशी काहीही संबंध नाही. वीस वर्षांनी अमेरिकेने ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर शर्यतीत सुवर्णपदक मिळवले आणि जमैकाची मक्तेदारी संपवली. जेव्हा एक स्वप्न पूर्ण होतं त्या वेळेला ऑलिम्पिकमध्ये काही स्वप्न भंगलेली असतात. थॉमसनचं स्वप्न असंच भंगलं.

खरं सांगायचं तर, ही शर्यत पाहताना काही काळय़ा रेषा वेगात पळतात असेच दिसते. काही वेळा त्या उडल्याचाही भास होतो. त्यामुळे पापणी मिटली की शर्यतीचा काही भाग तुम्हाला पाहता येत नाही. त्यामुळे पापणी मिटण्याचीसुद्धा सोय तुम्हाला नसते.

100 किंवा 200 मीटरच्या शर्यतीत नेहमी विजेते हे काळेच आफ्रिकन वंशाचे खेळाडू सापडतात, मग तो पुरुष असो किंवा ती स्त्री.

हे असं का आहे? विज्ञान त्याचं उत्तर देते. माणसांमध्ये दोन प्रकारचे स्नायू असतात. एक वेगाने आपुंचन पावणारे आणि दुसरे हळू आपुंचन पावणारे. सर्वसाधारणपणे ज्यांचे स्नायू वेगात आपुंचन पावतात ते खेळाडू स्पह्टक कामगिरी जास्त अधिक चांगली करू शकतात. ज्यांचे स्नायू हळू आपुंचन पावतात ते दमदारपणा (स्टॅमिना) दाखवू शकतात. ते लांब पल्ल्याच्या शर्यतीत भाग घेतात. त्याला आणखी एक बाजू आहे. यातली दादा मंडळी ही साधारण आपल्याला केनिया, इथिओपिया किंवा इतर पूर्व आफ्रिकन देशातली दिसतात. कारण ते समुद्रसपाटीपासून काही हजार फुटांवर  जन्माला येतात. तिथे प्राणवायू कमी असतो. त्यामुळे त्यांच्या हृदयाची आणि फुप्फुसाची क्षमता नैसर्गिकरीत्याच जास्त असते. देवाने पाठवताना जर हे गाठोडं तुम्हाला दिलं नसेल तर आयफेल टॉवर तुझ्या नावाने करतो, सोनेरी पदक जिंकून दाखव असं कोणालाही सांगितलं तर शक्य नाही.

आपण जर वेगात धावणाऱया खेळाडूंचा विचार केला तर, वेगात आपुंचन पावणाऱया स्नायूंचे शरीरातलं पर्सेंटेज किती जास्त असते तुम्हाला सांगतो. उसेन बोल्ट हा  अशा प्रकारच्या शर्यतीतला लिजंड. याक्षणी वेगवेगळय़ा ठिकाणच्या स्पर्धांचा विचार केला तर सर्वात वेगवान मानव तोच आहे. सर्वसाधारण माणसात वेगवान आपुंचन पावणारे स्नायू 50 टक्के असतात, तर उसेन बोल्टच्या शरीरात 83 टक्के आहेत. इतर जे खेळाडू जिंकतात त्यांच्या शरीरातल्या स्नायूंचं पर्सेंटेजसुद्धा आसपास असतं म्हणून ते धावताना बुलेट ट्रेनसारखे वाटतात. आणखीन एक गोष्ट विज्ञानाने दाखवली की, ही जी गुणवत्ता आहे ती समुद्रसपाटीवर जन्मलेल्या माणसांमध्ये ठासून भरलेली आहे आणि  त्यातल्या त्यात आफ्रिकन वंशाच्या. त्यामुळेच 100 मीटरपासून 400 मीटरपर्यंतच्या शर्यती या अमेरिकन किंवा पॅरिबियन बेटावरचे खेळाडू गाजवत असतात. वेस्ट इंडीजकडे वेगवान गोलंदाज म्हणून होते.

आपणही आपली शरीरयष्टी, आपली उंची, आपली ताकद, आपला स्टॅमिना आणि जेनेटिक्स यांचा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायला हवा आणि कोण कुठला खेळ खेळायला समर्थ आहे आणि अशा प्रकारचे खेळाडू कुठे सापडतील याचा शोध घ्यायला हवा. क्रिकेटमध्ये आयपीएल आल्यानंतर अतिशय पद्धतशीरपणे खेळाडूंचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळेच हल्ली बरेच क्रिकेटपटू हे फक्त शहरातून न येता विविध गावातून, विविध प्रांतातून येत असतात. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जर आपण खेळाडू शोधले तरच आपली भरभराट होऊ शकते. आपण ऑलिम्पिकमध्ये श्रीमंत स्वप्न पाहू शकतो. नाहीतर कांस्यपदकाच्या आणि चौथा क्रमांक या मध्यमवर्गीय स्वप्नावरच आपल्याला समाधानी राहावं लागेल.