दत्ता भरणे वाशिमचे पालकमंत्री

वाशिम जिह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे याआधी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. मतदारसंघात वेळ देता येत नसल्याने मुश्रीफ यांनी पालकमंत्रीपद सोडले होते.