
गेल्या 15 दिवसांपासून जोगेश्वरी पूर्व येथील प्रतापनगर, शिवटेकडी विभागातील नागरिक अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या समस्येमुळे हैराण झाले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रयत्नांमुळे येथील अपुऱ्या पाणीपुरवठय़ाची समस्या दूर झाली असून रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.
प्रतापनगर, शिवटेकडी येथील अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या पार्श्वभूमीवर विभागातील संतप्त रहिवाशांना शाखाप्रमुख मंदार मोरे यांच्या माध्यमातून महापालिका कार्यालयावर धडक दिली. माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या पुढाकाराने 8 जुलैला सहाय्यक आयुक्तांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, नंदकुमार ताम्हणकर, प्रदीप गांधी, शाखा संघटक रश्मी गोंडाबे, शाखा समन्वयक योगीता पाटील, युवती विभाग अधिकारी मानसी गोंडाबे, संजय सावंत, उपशाखाप्रमुख केशव चव्हाण, स्वरूप, श्रीपाद राणे, अनंत कुडतरकर आदी उपस्थित होते. या बैठकीत सहाय्यक आयुक्तांनी निर्देश दिल्याप्रमाणे प्रतापनगर येथे उदंचन केंद्रामध्ये दुरुस्तीचे काम केले.
उदंचन केंद्रात 215 हॉर्सपॉवरचे दोन पंप असून दिवसाआड एक पंप चालविला जातो. तांत्रिक बिघाडामुळे पंप चालत नसल्यामुळे या परिसरातील रहिवाशांना तीन-चार दिवस बिल्कुल पाणी येत नव्हते. उदंचन केंद्रातील पंप दुरुस्तीचे काम पालिका जल विभाग मध्यवर्ती यंत्रणेचे अधिकारी परांजपे, अदानी इलेक्ट्रिसिटीचे चव्हाण आणि किर्लोस्कर ग्रुपचे प्रतिनिधी यांच्या समन्वयातून करण्यात आले. त्यामुळे या विभागातील पाणीपुरवठा आता सुरळीत सुरू झाला आहे.