आठ वर्षांची प्रतीक्षा संपली; शिवसेनेमुळे जोगेश्वरी शामनगरवासीयांना मिळणार घरगुती गॅस  

जोगेश्वरी पूर्व विभागामध्ये शामनगर परिसरातील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर रोड, डी. जी. वायकर रोड येथील सर्व इमारतींमध्ये आता घरगुती गॅस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे रहिवाशांची गेल्या तब्बल आठ वर्षांची प्रतीक्षा संपली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी यासाठी प्रशासानाकडे पाठपुरावा केला.

या भागात गॅस पाईप लाईन टाकण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली, परंतु मजास बस आगारसमोर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे काही तांत्रिक अडचणींमुळे विशेष म्हणजे गॅस वितरण पंपनी आणि पालिका के  पूर्व विभागाच्या समन्वयाच्या अभावामुळे सदर काम स्थगित होते. त्यामुळे येथील रहिवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्यामुळे माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांच्या पुढाकाराने  गॅस वितरण पंपनीच्या वांद्रे पूर्व बीकेसी येथील मुख्य कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी शाहनवाज खान, इरफान शेख, संभाजी शिंदे यांची भेट संयुक्त बैठक घेऊन चर्चा केली. यावेळी शिवसेनेने पालिका आणि गॅस वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱयांशी समन्वय साधून तांत्रिक अडचणींमुळे स्थगित असलेले काम सुरू करण्यास भाग पाडले. त्यामुळे काम प्रगतीपथावर असून लवकरच या विभागातील लिली व्हाईट को. ऑ. हौ. सो., जॉय व्हेलेंन्सिया, ब्ल्यु मिडोज्, ऐश्वर्या हाईट्स, ओम श्री गणेश सोसायटी आणि परिसरातील रहिवाशांना याचा फायदा होणार आहे. सदर संयुक्त बैठकीला विधानसभा समन्वयक रवींद्र साळवी, माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर, उपविभागप्रमुख बाळा साटम, शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर, प्रदीप गांधी, मंदार मोरे, रवी सोगम, शैलेश बांदेलकर, नितीन गायकवाड, दीपक तोंडलेकर उपस्थित होते.