लाडकी बहिण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे विधान

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवत ताण पडला आहे अशी कबुली राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. तसेच याचा अर्थ असा नाही की इतर योजना बंद पडतील, सरकारने वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला आहे असेही कोकाटे म्हणाले.

नंदूरबारमध्ये पत्रकारांशी बोलताना माणिकराव कोकाटे म्हणाले की, लाडकी बहिण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर थोडाफार ताण पडला आहे. परंतु याचा अर्थ बाकीच्या योजना एकदम बंद पडतील असे नाही. सर्व विभागांना हवा तेवढा निधी दिला गेला आहे. मी विधानसभा निवडणुकीच्या वेळी स्वतः भाषणातून सांगितलं की, माझ्या 30-35 वर्षाच्या राजकीय कारकर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासासाठी निधी उपलब्ध झाला नाही तेवझा आताच्या राज्य सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यावर लाखो रुपये जमा झाले मग ते पंतप्रधान पीक विमा योजना असेल, प्रभू सन्मान योजना असेल, पीक विम्याच्या माध्यमातून पैसे असतील किंवा आपातग्रस्त नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून पैसे मिळाले असतील. काही शेतकऱ्यांना लाख लाख रुपये तर काही शेतकऱ्यांना दोन लाख रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केली आहे असेही कोकाटे म्हणाले.