मुसळधार पावसामुळे दिल्ली पाण्याखाली

दिल्लीत दोन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी कमरेइतके पाणी साचले, रस्ते पाण्याखाली गेले, जनजीवन विस्कळीत झाले, प्रचंड वाहतूककाsंडी झाली. दिल्लीची ही अवस्था पाहून दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना प्रचंड संतापले आणि आपत्कालीन बैठक बोलावली. सुट्टीवर गेलेल्या अधिकाऱयांना पुन्हा कामावर बोलावण्याचे आणि कुणीही अधिकाऱयाने दोन महिने अजिबात सुट्टीवर न जाण्याचे निर्देश दिले. अधिकाऱयांना ज्या भागात पाणी साचले आहे किंवा पूरस्थिती निर्माण झाली आहे त्याठिकाणी पाण्याचे पंप बसवण्याचे आदेशही सक्सेना यांनी दिले. बैठकीत दिल्ली जल बोर्ड, सिंचन आणि पूर नियंत्रण विभाग, दिल्ली पोलिसांतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.