
अबुधाबीमध्ये राहणाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. बाल्कनी किंवा टेरेसवर कपडे सुखवण्यासाठी टाकणे हा गुन्हा असून असे करणाऱ्या व्यक्तीला 500 दिऱ्हम म्हणजेच 13 हजार रुपये दंड आकारला जातो. दुसऱ्यांदा ही चूक केल्यास 25 हजार, तर तिसऱ्यांदा चूक केल्यास 50 हजार रुपये दंड आकारला जातो. शहराचे सौंदर्य टिकून राहण्यासाठी अबुधाबीत हा नियम सुरू करण्यात आला आहे. तसेच अस्वच्छ वाहने दिसल्यास किंवा वाहनांचे बॉडी पार्ट्स सार्वजनिक ठिकाणी दिसल्यास 1 लाखांचा दंड ठोठावला जातो.