दारूच्या नशेत चोरट्याने लिहिले भावनिक पत्र

नंदुरबार येथील तळोदा शहरातील एका बिअर बारमध्ये शुक्रवारी एका चोरट्याने लिहिलेल्या भावनिक पत्राची चर्चा सुरू आहे. या चोराने मनसोक्त मद्यप्राशन केले आणि नंतर पत्र लिहिले. चोराने लिहिले माझी कोणाशीही वैयक्तिक दुश्मनी नाही. माझी हालतच बेबस आहे. पुढे त्याने लिहिले, पोलीस खरेच इमानदार असतात का? खराखुरा चोर कोण? जो चोरतो की जो चोर बनवतो. माणूस पैशांवर प्रेम करतो. एकंदरीत चोराने त्याचा भूतकाळच पत्रातून मांडण्याच प्रयत्न केला. पत्राची चर्चा रंगली आहे.