
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहतुकीच्या नियमांची दुपटीने होळी झाली. नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण दुपटीने वाढले असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. यंदाच्या होळीच्या दिवशी वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 7,230 चलन जारी करण्यात आले. गतवर्षी अर्थात 2024 मध्ये 3,589 जणांवर कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यपान करून वाहन चालवताना पकडलेल्यांची संख्या 2024 मधील 824 च्या तुलनेत 2025 मध्ये 1,213 वर पोहोचली आहे. तसेच हेल्मेटच्या नियमांचे उल्लंघन करणाऱया लोकांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा 56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.