Drunk and Drive – सी लिंकवर मद्यधुंद व्यावसायिकाच्या कारची दुभाजकाला धडक, तीन जण जखमी

सीलिंकमुळे वांद्रे-वरळी प्रवास २०-३० मिनिटांत होतो.

वांद्रे-वरळी सी लिंकवर कार अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात चालकासह त्याचे दोन मित्र जखमी झाले आहेत. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केलेय जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रविवारी पहाटे वांद्रे वरळी सी लिंकवर एका ३० वर्षीय व्यावसायिकाची आणि त्याच्या दोन मित्रांची भरधाव गाडी दुभाजकाला धडकल्याने ते जखमी झाले, असे पोलिसांनी सांगितले.

घाटकोपर येथे राहणारा 32 वर्षीय व्यावसायिक आपल्या दोन मित्रांसह हाजी अलीहून सी-लिंकमार्गे घरी चालला होता. व्यावसायिक दारुच्या नशेत असल्याने सी-लिंकवर त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला धडकली. यात कारमधील तिघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी वरळी पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.