पंजाबमध्ये 127 कोटींचे ड्रग्ज जप्त

पंजाबमध्ये 18 किलो वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या अमली पदार्थाची बाजारातील किंमत तब्बल 127.54 कोटी रुपये इतकी आहे. पंजाब पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (एएनटीएफ) बॉर्डर रेंज अमृतसरने या प्रकरणी अमृतसर येथील घरिंडा ठाण्यातील खैरा गावातील रहिवासी हिरा सिंग याला अटक केली आहे. हिरा सिंग आणि त्याचा साथीदार पुलविंदर सिंग ऊर्फ किंडा हे पाकिस्तानातील ड्रग्ज तस्कर ‘बिल्ला’ याच्या संपर्कात होते. बिल्लाच्या सूचनेनुसार हे दोघेही सीमेपलीकडून हेरॉइनची तस्करी करायचे आणि पंजाबमध्ये ते पुरवायचे.