महाराष्ट्राला लाभलेल्या 720 किलोमीटरच्या समुद्रकिनाऱयावरून 12 मैलांपर्यंतच्या सागरी हद्दीत बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱया नौकांची आता खैर नाही. या नौकांवर उद्यापासून ड्रोनची करडी नरज राहणार आहे. या ड्रोनमधील डाटाच्या आधारावर संबंधित नौकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्राच्या समुद्रात मोठय़ा प्रमाणात अवैध मासेमारी होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात. एकाच वेळी अशा नौकांवर नजर ठेवता यावी म्हणून अद्ययावत ड्रोन प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. उद्यापासून ही प्रणाली कार्यरत केली जाणार आहे. मुंबईसह सात जिह्यांतील नऊ समुद्रकिनाऱयांवरून ड्रोन प्रणालीचे प्रात्यक्षिक एकाचवेळी केले जाणार आहे.
ड्रोन यंत्रणेमुळे राज्यातील सागरी क्षेत्र हे पॅमेऱयाच्या नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे अवैध मासेमारीला आळा घालणे शक्य होणार आहे. बेकायदा मासेमारी करणाऱया नौकांवर कारवाईसाठी ड्रोन वेब सोल्युशनस स्ट्रिमिंगचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे.