ड्रीम स्पोर्टस अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई लीगमध्ये अंतिम फेरीत रिलायन्स फाउंडेशन यंग चॅम्प्स(आरएफवायसी) संघाने ब्रदर्स स्पोर्ट्स असोसिएशन संघाचा 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. कुपरेज फुटबॉल स्टेडियम येथे पार पडलेल्या या स्पर्धेतील मुंबई लीग मधील विजेता संघ17 वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. बंगळुरू विभागातून चेन्नईन एफसी, दिल्ली विभागातून विजेता संघ पंजाब एफसी हे पात्र ठरले आहेत.