अमेरिकेत राहण्याचे स्वप्न भंगणार; 18 हजार हिंदुस्थानींना अमेरिका माघारी पाठवणार

अमेरिकेत राहत असलेल्या 18 हजार हिंदुस्थानी लोकांना अमेरिका माघारी पाठवणार आहे. यातील बहुतांश लोक हे गुजरात, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील आहेत. अमेरिकेत हिंदुस्थानी स्थलांतरितांची संख्या सध्याच्या घडीला जवळपास 7 लाख 25 हजार इतकी आहे. डोनाल्ड ट्रम्प हे नव्या वर्षात पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यानंतर या मोहिमेला वेग येणार आहे.

अमेरिकेतील निर्वासित लोकांच्या हद्दपारी योजनेवर काटेकोरपणे काम करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे अमेरिकेतील 18 हजार हिंदुस्थानी लोकांवर हद्दपार होण्याची टांगती तलवार आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये यूएसने हिंदुस्थानी नागरिकांना परत पाठवण्यासाठी चार्टर्ड फ्लाइटचा वापर केला. हे पाऊल यूएस होमलँड सुरक्षा विभाग आणि हिंदुस्थानी सरकारच्या सहकार्याने उचलण्यात आले. 2024 मध्ये एकूण 519 हिंदुस्थानी नागरिकांना अमेरिकेतून पाठवण्यात आले आहे. काही वर्षांपासून सीमा ओलांडून अमेरिकेत घुसखोरी करणाऱया नागरिकांची संख्या वाढली. 90 हजार हिंदुस्थानी नागरिकांना पकडले गेले आहे. त्यांच्यावर अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश करण्याचा आरोप आहे. अमेरिकेत जाणाऱया हिंदुस्थानी लोकांची संख्या दिकसेंदिकस काढत चालली. अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी सुद्धा हिंद्स्थानातील अनेक राज्यातील किद्यार्थ्यांची संख्या झपाटय़ाने काढत आहे.

हिंदुस्थान असहकार देशांच्या यादीत

स्वीत्झर्लंडने हिंदुस्थानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड दर्जा मागे घेतला आहे, तर आता अमेरिकेनेसुद्धा हिंदुस्थानला दुसरा झटका दिला आहे. यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटने हिंदुस्थानला ‘असहकार’ देशांच्या यादीत टाकले आहे. हिंदुस्थानी अधिकाऱयांकडून नागरिकत्व पडताळणी, प्रवासी कागदपत्रे जारी करणे आणि हद्दपारीची प्रक्रिया यामध्ये होणारा विलंब यामुळे हे घडले आहे. यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटनुसार, गैर-सहकारी देशांच्या यादीत हिंदुस्थानसह चीन, रशिया, पाकिस्तान आणि इराण यांसारख्या 15 देशांचाही समावेश आहे.

20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेकारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प हे दुसऱयांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. 2016 साली ते राष्ट्राध्यक्ष बनले होते. त्यानंतर जो बायडेन यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे आली होती. ट्रम्प हे सर्कात कयोकृद्ध राष्ट्राध्यक्ष होतील. 20 जानेकारीला त्यांचे कय 78 कर्ष 221 दिकस असेल. त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपेल त्याकेळी त्यांचे कय 82 कर्षे असेल. याआधी जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती.