![Untitled design (12)](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-12-1-696x447.jpg)
या वर्षाच्या अखेरपर्यंत डीआरडीओ हलक्या लढाऊ विमानांचे एलसीए- एमके२ प्रोटोटाईपचे लाँच करेल. एरोनॉटिक डेव्हलपमेंट एजन्सीचे महासंचालक जितेंद्र जाधव यांनी याबाबतची माहिती दिली. या वर्षाच्या अखेरीस आधी प्रोटोटाईप रोलआऊट करू. 2026 च्या पहिल्या तिमाहीत विमान उड्डाण घेईल, असे जाधव यांनी सांगितले.
एलसीए- एमके२ लढाऊ विमाने पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून एअरफोर्सच्या ताफ्यात 2028-29 मध्ये येतील. त्यामुळे निश्चितच वायुदलाची ताकद वाढेल. जितेंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅडव्हान्स मीडिअम कॉम्बॅट एअरक्राफ्ट 2026-27 मध्ये लाँच होण्याची आशा आहे. अॅडव्हान्स मीडिअम कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि एलसीए- एमके२ वायुदलाच्या आधुनिकीकरण योजनेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. लढाऊ स्क्वाड्रन खूप कमी होत चालले आहेत. वायुदलाला नव्या विमानांची खूप गरज आहे.
वायुदलाला मिग 21, मिग 26 आणि जग्वार विमानांच्या जागी नव्या फायटर जेटची गरज आहे. ‘एलसीए- एमके२’ चे पहिले प्रोटोटाईप 2023 मध्ये लाँच करणार होते. मात्र आता ते 2026-27 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. ‘एलसीए- एमके२’ लढाऊ विमान रशियाच्या मिग 21 आणि मिग 26 आणि जग्वारच्या ताफ्यात जागा मिळेल.
जग्वारचे ६ स्क्वाड्रन होणार निवृत्त
जग्वार या लढाऊ विमानाचे 6स्क्वाड्रन टप्प्याटप्प्याने 2032 पर्यंत निवृत्त होणार आहेत. ही प्रक्रिया 2025 पासून सुरू होईल. त्यानंतर पुढील दशकभरात मिराज 2000 आणि मिग 29 च्या ताफ्यातील तीन स्क्वाड्रन टप्प्याटप्प्याने सेवेतून हटवले जातील. – ‘एलसीए- एमके२’ 65 टन शस्त्रास्त्रे वाहून नेऊ शकतो. त्यामध्ये 3320 किलो इंधन ठेवले जाऊ शकते. लढाऊ विमानाची रेंज 3 हजार किलोमीटर पर्यंत आहे.