
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच डीआरडीओमध्ये 150 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी (अभियांत्रिकी) 75, पदवीधर अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी (नॉन-इंजिनीअरिंग) 30, डिप्लोमा अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी 20, आयटीआय अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी 25 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. भरतीसंबंधी सविस्तर माहिती nats.education.gov.in वर देण्यात आली आहे. निवडलेल्या उमेदवारांची पहिली यादी 23 मे 2025 रोजी प्रकाशित केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना 12 महिन्यांसाठी अप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळेल.