राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू समुद्रकिनाऱ्यावर…

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चार दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. मुर्मू यांनी सोमवारी सकाळी पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला. रविवारी पुरीतील वार्षिक रथयात्रा पाहिली. यासंबंधीचा अनुभव त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. दरम्यान, मुर्मू यांनी भुवनेश्वर येथील लेण्यांचीही पाहणी केली. याचेही पह्टो सोशल मीडियावर व्हायरल झाले.