माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा?, मोदींचं नाव न घेता संमेलनाध्यक्ष डॉ. भवाळकर यांची टीका

माझा जन्म जैविक नाही वगैरे म्हणणाऱ्यांवर आपण किती विश्वास ठेवायचा? अशी अप्रत्यक्ष टीका 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी पंतप्रधान मोदी यांचं नाव न घेता केली आहे. दिल्लीत आज 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात झाली आहे. याच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. यानंतर झालेल्या दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.

यावेळी बोलताना डॉ. तारा भवाळकर म्हणाली की, ”देहाचा विटाळ, देहीचं जन्मला, शुध्द तो जाहला कवण प्राणी।। उत्पत्तीचे मूळ विटाळाचे स्थानं। कोण देह निर्माण नाही जगी।।’ असा मला एखादा माणूस दाखवून द्या की, जो विटाळाच्या स्थानातून जन्माला आला नाही. आता एखादा उठतो व म्हणतो की, माझा जन्म जैविक नाही वगैरे, त्याच्यावर आपण किती विश्वास ठेवायचा हा वेगळा विषय आहे.”