डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शिवराज बशेट्टीप्पा नाकाडे (90) यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सायंकाळी 5 वाजता गंगापूर येथील शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
डॉ. नाकाडे हे पुण्याच्या मराठवाडा मित्रमंडळाचे आजीव सभासद व उदगीर येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांनी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्यपदही भूषविले. त्यानंतर 1994 ते 1999 या कालावधीत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.