>> डॉ. मनोहर देसाई
जरदोजी विणकाम ही पर्शियन संस्कृतीतून आलेली कला हिंदुस्थानमध्ये मुघल राजवटीमध्ये अधिक स्थिरावली आणि या कलेमध्ये काम करणारे अनेक कारागीर येथे तयार झाले. जरदोजी किंवा जरदौजी म्हणजेच सोन्याचे भरतकाम. यातील जर म्हणजे झार, जरीन किंवा सोन्याच्या तारा आणि दोजी म्हणजे शिलाई. सोन्याच्या तारांचा वापर करून केलेला हा भरतकाम प्रकार भोपाळ, लखनऊ, हैदराबाद, वाराणसी या भागांमध्ये खूपच लोकप्रिय ठरला.
इतिहासात अनेक राजे हे आपल्या राज्याच्या कक्षा वावादूरपर्यंत इतर संस्कृतींपर्यंत पोहोचले. एखाद्या राज्यावर विजय मिळवून तेथे प्रस्थापित करणे हा जरी राज्य वायाचा भाग असला तरीसुद्धा या प्रक्रियेमध्ये त्या-त्या राज्यामध्ये असणाऱया संस्कृतीत जगणाऱ्या लोकांना नकळतपणे अनेक गोष्टींचा स्वीकार करावा लागत असे. काही वेळेला या राजेरजवाडय़ांमध्ये सामंजस्याने करार होऊन युद्धे टाळली जात असत. एकदा सर्व बाबी स्थिर झाल्या की, मग दोन राज्यांच्या संस्कृतींचा मिलाप व्हायला सुरुवात होत असे. यात व्यापाराच्या निमित्ताने अनेक व्यापारी, कलावंत, जे राजाश्रयावर अवलंबून असत, त्यांचीसुद्धा वाटचाल ठरत असे. हिंदुस्थानमध्ये अशा अनेक कलांचा वरील उल्लेख केलेल्या प्रकारामुळे प्रवेश झाला आणि त्या कला इथे कौतुकास पात्र ठरल्या व काही भागांत स्थिरावल्या.
अशाच कलांपैकी एक कला म्हणजे जरदोजी विणकाम. पर्शियन संस्कृतीतून आलेली ही कला हिंदुस्थानमध्ये मुघल राजवटीमध्ये अधिक स्थिरावली आणि या कलेमध्ये काम करणारे अनेक कारागीर येथे तयार झाले. जरदोजी किंवा जरदौजी म्हणजेच सोन्याचे भरतकाम. यातील जर म्हणजे झार, जरीन किंवा सोन्याच्या तारा आणि दोजी म्हणजे शिलाई. सोन्याच्या तारांचा वापर करून केलेले भरतकाम म्हणजेच जरदोजी. आपल्याकडे बरेच जण याचा जरदोशी विणकाम प्रकार असा उल्लेख करताना दिसतात. हिंदुस्थानमध्ये भोपाळ, लखनऊ, हैदराबाद, वाराणसी या भागांमध्ये जरदोजी भरतकाम खूपच लोकप्रिय झाला. वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांव्यतिरिक्तसुद्धा अनेक रसिक या कलेला पसंती देतात. मखमलीच्या किंवा उत्तम प्रतीच्या कापडाची निवड या भरतकामासाठी केली जाते. हे भरतकाम केल्यानंतर या कापडाचे वजन वासोने किंवा त्याला पर्याय म्हणून चांदीच्या तारा तयार करून या विणकामासाठी वापरल्या जातात. अलीकडे सोने आणि चांदी यामध्ये तयार केलेले कापड अतिशय महाग असल्यामुळे विणकरांनी त्याला पर्याय म्हणून सोने-चांदीसदृश धातूचा वापर केला आणि त्या पर्यायातून सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीपर्यंत या विणकामाच्या कलाकृती तयार करायला सुरुवात केली.
राजाश्रयात वाही कला त्यामुळेच आता सर्वसामान्यांच्या विवाह समारंभांमधून नवरी मुलीच्या वस्त्रालंकारांमध्ये सामावली गेली. विणकामासाठी लागणाऱ्या धातूच्या तारा या सपाट, गुंडाळलेल्या, स्प्रिंगसारख्या वळणे असणाऱया अशा प्रकारात तयार करून ठेवल्या जातात. कापडावर हे विणकाम करताना विविध पद्धतीचे मणी, मोती, विविध रंग आणि प्रकारांचे खडे वापरले जातात. त्यामुळेच या विणकामानंतर या कापडांचे वजन वा काही चित्रपटांमधून नायिकेच्या अंगावर परिधान केलेला वस्त्रालंकार हा जरदोजी प्रकारातला असून त्याचे वजन अमुक अमुक किलो आहे आणि एवअसूनही या नायिकेने अतिशय उत्तम प्रकारे नृत्य साकारले आहे… वगैरे विश्लेषण कला समीक्षक आवर्जून करतात.
‘श्यामची आई’ चित्रपटांमधले ‘भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीचे बंधू शोभे नारायण’. महाभारताच्या कथेमध्ये श्रीकृष्णासाठी द्रौपदीने आपले उच्च दर्जाचे वस्त्र त्वरित फाडून दिले होते. परंतु त्या वस्त्राचा उल्लेख इथे अतिशय सुंदर प्रकारे झालेला दिसतो. यात ‘भरजरी गं पितांबर’ म्हणजेच ‘जरीने भरलेले’ असा हा उल्लेख कापडामध्ये जरीचे काम असायचे याची माहिती देतो किंवा कवीने त्या कापडाप्रती केलेली ती कल्पना कलाकृती असू शकते. जरदोजी भरतकाम प्रकार आणि या गाण्याचा कुठेही संबंध नाही फक्त कापडावरील भरजरी जरीकाम याचा वारंवार उल्लेख झाला आणि या गाण्याचे शब्द आठवले म्हणून लिहिण्याचा मोह आवरला नाही. अनेक सोनारांकडे अशा सोन्याचे जरीकाम असणाऱया वस्त्रांचा गहाण ठेवण्यासाठी उपयोग होत असे. काही ठिकाणी पैशांची जमवाजमव करण्यासाठी सोन्याचे जरीकाम असणारी वस्त्रs विकली जात असत. पुही वस्त्रs जाळून यातून सोन्याची जर काघेतली जात असे आणि यात अनेक कलाकृती नष्ट होत असत. जरदोजी प्रकारातसुद्धा पुसोन्याचे भरतकाम असणाऱया वस्त्रांमधून त्या तारा काघेतल्यानंतर या कलाकृती नष्ट होत असत.
या लेखाच्या निमित्ताने एक आवाहन करावेसे वाटते. अशा प्रकारचे वस्त्रालंकार जर आपल्या कुटुंबात वारशाने आपल्याकडे आले असतील तर पुच्या पिया अलंकारांचे जतन करावे. अडगळ म्हणून अनेक कलाकृती भंगारात दिल्या जातात आणि वारशाने मिळालेल्या मोठमोठय़ा प्रॉपर्टी सोने-चांदी या मिरवल्या जातात. कला संस्कृतीपासून दूर जाणाऱया अनेक नव विचारवंतांची अशा वेळेला कीव करावीशी वाटते. पाकिस्तानमध्ये हा कला प्रकार खूपच लोकप्रिय आहे आणि येथील विवाह समारंभांमध्ये जरदोजी भरतकाम असणारे वस्त्रालंकार हे प्रतिष्ठेचे समजले जाते. लखनऊ, भोपाळ येथील कारागीर त्यांच्या कलाकृतींना अनेक देशांमध्ये मागणी असल्याचे आवर्जून सांगतात. तंत्रज्ञानाचा वापर आता बऱयाच क्षेत्रांत होतोय आणि या विणकामामध्येसुद्धा मशीनवर काम करण्याचा प्रयत्न काही कारागीर करताना दिसतात. एखादा रसिक ग्राहक जेव्हा अशा वस्तू विकत घेण्यासाठी जातो तेव्हा अमुक एक काम हाताचे असल्यामुळे त्याची किंमत अधिक आहे आणि अमुक एक कामामध्ये मशीनचा वापर असल्यामुळे या कलाकृतीची किंमत तुलनेने कमी आहे हे व्यापारी त्यांना आवर्जून सांगतात. हाताने केलेल्या कारागिरीला जास्त मागणी असते. कारण त्या कलाकृती मोजक्याच असतात.
विविध फुले, पाने, वेली, पक्षी, प्राणी हे आकार जरदोजी भरतकामाने कापडांवर खुलतात. मणी, मोती किंवा विविध खडय़ांच्या वापराने विविध नक्षी कापडांवर सजतात. विणकामासाठी वापरलेली तार कापडावर विविध आकार करताना कारागीर अतिशय कौशल्याने तिला वळवतात. तारेतील लवचिकता आणि धातूची चमक यामुळे तयार झालेली नक्षी पाहणाऱयांचे लक्ष वेधून घेते. जरदोजी या भरतकामामुळे त्यातून तयार झालेल्या कापडावरील नक्षीकामाला कलाकृती म्हणूनच संबोधावेसे वाटते. ही कला जिवंत राहावी म्हणून अनेक कुटुंबे त्यांच्या गावी व्यवसाय म्हणून जरी या क्षेत्रात असली तरीसुद्धा तळमळीने पुपिही कला शिकवण्याचा प्रयत्न करतात. देश आणि गावे यांच्या वेशींमध्ये तुम्ही आम्ही चर्चा करून अडकू शकतो, परंतु विणकामातून साकारलेल्या या नक्षीकामाला कोणत्याच राज्याच्या, देशाच्या सीमा अडवू शकत नाहीत. पर्शियन, मुघल… एकामागून एक आलेल्या कलाकारांनी साकारलेल्या कलाकृतींची ओरसिकांच्या मनाला लागून राहते आणि नव्या पिमंडळीसुद्धा या कपडय़ांसाठी आग्रह करताना दिसते.