इंदुराणी जाखर पालघरच्या नव्या जिल्हाधिकारी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखर यांची बदली करण्यात आली असून त्यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या निवृत्तीनंतर हे आदेश निघाले आहेत. इंदुराणी जाखर या 2016 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. दरम्यान, गेल्याच आठवडय़ात पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.