डॉ. चंद्रकांत म्हस्के ससूनचे नवे डीन

ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले असून, ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे सोपवला आहे. डॉ. म्हस्के यांनी गुरुवारी ससूनच्या अधिष्ठातापदाचा पदभार स्वीकारला.  आगामी काळात रुग्णसेवा केंद्रस्थानी ठेवून काम करणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी संशोधनपूरक वातावरण निर्माण करण्यावर भर दिला जाईल, असे डॉ. म्हस्के यांनी सांगितले.